माझी ॲक्सेस की काम करत नसल्यास, काय करावे?
तुम्हाला पुढील एरर मेसेज मिळाल्यास: “तुमची ॲक्सेस की वैध नाही असे दिसते. असे पुन्हा झाल्यास, कृपया तुमच्या सेवा व्यवस्थापकाशी संपर्क साधा.” समस्या ट्रबलशूट करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:
- तुम्ही पहिले पाच वर्ण, “ss://” सह संपूर्ण ॲक्सेस की एंटर करत असल्याची खात्री करा. या गोष्टी कदाचित क्लिपबोर्डवर आपोआप कॉपी होणार नाहीत. संपूर्ण ॲक्सेस की कशी दिसते याचे उदाहरण पुढे दिले आहे (हा फक्त नमुना असून, काम करणार नाही):
ss://[email protected]:39485/?outline=1
- तुमची ॲक्सेस की तुमच्या क्लिपबोर्डवर अजिबात कॉपी होत नसल्यास, हे तुमच्या मेसेजिंग ॲप किंवा प्लॅटफॉर्ममुळे होऊ शकते. तुमच्या संपर्क सूचीमध्ये नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला मेसेज मिळाल्यावर असे होण्याची सर्वाधिक शक्यता असते. तुम्ही मेसेजमधून कोड कॉपी करत असल्यास, पाठवणारा तुमच्या संपर्कांमध्ये जोडला असल्याची खात्री करा, त्यानंतर लिंक ॲक्सेस करण्याचा पुन्हा प्रयत्न करा.
- तुम्हाला पहिली आणि दुसरी पायरी पूर्ण केल्यानंतरही एरर मेसेज मिळत असल्यास, सर्व्हर ब्लॉक केला असल्याची किंवा ॲक्सेस की आता वैध नसल्याची सर्वाधिक शक्यता आहे. तुम्ही सेवा व्यवस्थापक असल्यास, स्वतःसाठी नवीन की जनरेट करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, नवीन कीसाठी तुमच्या सेवा व्यवस्थापकाशी संपर्क साधा.