फायरवॉल एरर
तुम्हाला तीन प्रकारच्या फायरवॉल समस्या येऊ शकतात:
तुम्हाला नेटवर्क फायरवॉलद्वारे ब्लॉक केले जाऊ शकते.
तुम्ही शाळेमधील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणासारख्या फायरवॉल असलेल्या नेटवर्कशी कनेक्ट केलेले असताना Outline इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करत असल्यास, वेगळ्या नेटवर्कवर असताना इंस्टॉल करून पहा.
हा पर्याय काम करत नसल्यास, तुमचा Outline सर्व्हर आणि फायरवॉल असलेले नेटवर्क यांमधील कनेक्शनची अनुमती देण्यासाठी कृपया तुमच्या नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा. तुमच्या Outline सर्व्हरचा आयपी अॅड्रेस आणि ज्यावर Outline रन होत आहे तो पोर्ट, तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. या गोष्टी इंस्टॉलेशन स्क्रिप्टच्या शेवटी नमूद केलेल्या असतात.
तुम्हाला डिव्हाइस फायरवॉलद्वारे ब्लॉक केले जाऊ शकते.
मानक नसलेले पोर्ट किंवा ओळखल्या न जाऊ शकणाऱ्या सॉफ्टवेअरवरील आउटगोइंग कनेक्शन ब्लॉक करणारे सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसवर असल्यास, (CheckPoint चे ZoneAlarm), Outline साठी एक्सेप्शन कसे तयार करावे हे जाणून घेण्याकरिता कृपया तुमच्या डिव्हाइस अथवा सॉफ्टवेअरचे दस्तऐवज पहा.
तुम्हाला सर्व्हर फायरवॉलद्वारे ब्लॉक केले जाऊ शकते.
ज्यावर Outline रन होत आहे असे पोर्ट उघडण्यासाठी, तुम्ही निवडलेल्या क्लाउड पुरवठादाराकरिता तुमच्या सर्व्हर फायरवॉलवर तुम्ही मॅन्युअली एक्सेप्शन तयार करणे आवश्यक असू शकते. तुम्ही इंस्टॉलेशन स्क्रिप्ट रन केल्यानंतर, तुम्हाला रॅंडम पद्धतीने निवडलेले दोन पोर्ट दाखवले गेले पाहिजेत, ज्यांवर तुमच्या सर्व्हरमध्ये Outline रन होत आहे. हे दोन पोर्ट उघडणे पुरेसे आहे.
तुमच्या सर्व्हर फायरवॉलवर एक्सेप्शन तयार करण्यासाठी, आम्ही शिफारस करतो, की तुम्ही 'ufw' आणि 'iptables' चा दस्तऐवज पाहावा: