डेटा आणि माहिती संग्रह
जोपर्यंत तुम्ही वैयक्तिक माहिती देण्याचे निवडत नाही तोपर्यंत Outline ती गोळा करत नाही. Outline तुम्ही भेट देता त्या वेबसाइटबद्दल माहिती किंवा तुम्ही कोणासोबत अथवा काय संभाषण करता हे गोळा करत नाही.
तुम्ही Outline Manager द्वारे तृतीय पक्ष क्लाउड पुरवठादारासह खाते तयार करत असल्यास किंवा लॉग इन करत असल्यास, तुमचा ईमेल अॅड्रेस, नाव, बिलिंग माहिती आणि पेमेंट तपशील यांसारखी तुम्ही तुमच्या तृतीय पक्ष क्लाउड पुरवठादाराला दिलेली कोणतीही माहिती आम्ही मिळवत नाही.
आम्ही आपोआप मिळवतो अशी माहिती
आम्ही दोन प्रकारची माहिती आपोआप गोळा करतो.
१. सर्व्हर IP
Quay.io द्वारे Outline सर्व्हर IP गोळा केला जातो आणि नवीनतम सुरक्षा व वैशिष्ट्य सुधारणांसह सर्व्हर आपोआप अपडेट होतो, तेव्हा आमच्यासाठी तो अॅक्सेस करण्यायोग्य बनवला जातो. सर्व्हर IP द्वारे क्लाउड सर्व्हर पुरवठादार आणि जिथे Outline सर्व्हर सेट केला गेला आहे ते शहर ओळखले जाऊ शकते, पण हा सर्व्हर कोण रन करत आहे किंवा तो कोण अॅक्सेस करत आहे याबद्दल माहिती दिली जात नाही.
२. वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य नसलेली तांत्रिक माहिती
Outline क्रॅश झाल्यास किंवा एखादे घातक एक्सेप्शन आढळल्यास अथवा तुम्ही Outline अॅपद्वारे मॅन्युअली फीडबॅक पाठवल्यास, खाली सूचीबद्ध केलेल्या माहितीचा अहवाल दिला जाईल. ही माहिती फक्त स्थिरता किंवा परफॉर्मन्स समस्या ओळखण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी वापरली जाईल.
- देश
- लोकॅल
- क्रॅश / एक्सेप्शनची तारीख आणि वेळ व वापरकर्त्याने ‘याबद्दल’ हा विभाग उघडला आहे, यांसारखे पूर्वीचे १०० इव्हेंट
- स्टॅटिक प्रकारे संकलित केलेले एक्सेप्शन मेसेज
- OS चे नाव आणि आवृत्ती
- फोनचे मॉडेल (लागू असल्यास)
- अॅपची सुरू होण्याची वेळ
- ब्राउझर
- रचना
- Outline ची आवृत्ती आणि बिल्ड नंबर
ही माहिती HTTPS वापरून Sentry (sentry.io) या तृतीय पक्ष, मुक्त स्रोत एरर ट्रॅकिंग पुरवठादाराकडे ट्रान्सफर केली जाते. तुमचा डेटा अनधिकृत अॅक्सेस, डिस्क्लोजर, वापर आणि नुकसान या गोष्टींपासून सुरक्षित करण्यासाठी Sentry हे विविध औद्योगिक मानक तंत्रज्ञाने व सेवा वापरते. तुम्हाला Sentry च्या धोरणांबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया https://sentry.io/security/ आणि https://sentry.io/privacy/ ला भेट द्या किंवा [email protected] वर संपर्क साधा. Sentry द्वारे स्टोअर केलेला सर्व Outline डेटा फक्त Outline टीमचे सदस्य अॅक्सेस करू शकतात अशा प्रकारे प्रतिबंधित केला जातो.
निवड केल्यावरच आम्हाला माहिती मिळते
निवड केल्यावर Outline द्वारे पुढील माहितीचा अहवाल Outline टीमला दिला जातो.
१. वापर मेट्रिक
शेवटच्या तासासाठी आणि प्रत्येक अॅक्सेस कीनुसार, ट्रान्सफर केलेल्या बाइटची संख्या, वापरकर्त्याने सर्व्हरशी कनेक्ट केले होते तो कालावधी, वापरलेल्या क्रेडेंशियलचे मूळ देश व ऑटोनोमस सिस्टीम आणि कोणतीही वैशिष्ट्ये सुरू किंवा बंद केली आहेत का यासंबंधित डेटा प्रत्येक Outline सर्व्हरद्वारे आपोआप गोळा केला जातो. संवादाचा आशय किंवा कोणताही वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य मेटाडेटा (उदा. लॉग इन, ईमेल, डिव्हाइस आयडी इत्यादी) लॉग केला जात नाही. सर्व मेट्रिक सर्व्हर आयडीशी जोडली जातात. सर्व्हर आयडी बदलण्यासंबंधित सूचना इथे पाहता येऊ शकतात.
बाय डीफॉल्ट, Outline सर्व्हर द्वारे मेट्रिक Outline टीमसोबत शेअर केली जात नाहीत. सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटरने वापर मेट्रिक शेअर करण्याची स्पष्टपणे निवड केल्यास, ही माहिती दर तासाला Outline टीमला सुरक्षितपणे पाठवली जाईल. ६० दिवसांनंतर, वापर मेट्रिक देश पातळीवर एकत्रित केली जातील. Outline Manager मधील ‘सेटिंग्ज’ मेनूला भेट देऊन सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर कधीही त्यांचे वापर मेट्रिक शेअरिंग प्राधान्य बदलू शकतात.
तुमच्या सर्व्हरच्या वापराविषयी निनावी मेट्रिक आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद, कारण वापरासंबंधित ट्रेंडचे मापन करण्यासाठी आणि उत्पादनामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही त्यांचा वापर वापरतो.
उदाहरणार्थ, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटरने आमच्यासोबत वापर मेट्रिक शेअर करण्याची निवड केल्यास, आम्हाला हे दर्शवणारी माहिती मिळू शकते, की आयडी १२३४५ असलेला सर्व्हर काल ३ तासांसाठी वापरला गेला होता, ज्याद्वारे डेटा मर्यादा वैशिष्ट्य सुरू केलेल्या, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये वापरलेल्या प्रत्येकी तीन कीमधून, एकूण ५०० मेगाबाइट डेटा ट्रान्सफर केला जात होता.
२. तुम्ही फीडबॅक सबमिट केला असल्यास, तुमच्या टिप्पण्या आणि ईमेल
Outline Manager व Outline ॲप्सद्वारे तुम्हाला टीमला फीडबॅक सबमिट करता येतो. वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहिती समाविष्ट न करण्याची आम्ही शिफारस करतो, पण तुम्हाला टीमकडून प्रतिसाद हवा असल्यास ईमेल फील्ड पर्याय म्हणून उपलब्ध आहे. आम्ही काही मूलभूत माहितीदेखील आपोआप एकत्रित करतो, जेणेकरून आम्हाला तुमचा फीडबॅक समजू शकेल. आम्ही कोणता डेटा गोळा करतो हे पाहण्यासाठी कृपया वरील “आम्ही आपोआप मिळवतो अशी माहिती” या अंतर्गत, आयटम २ पहा. Outline च्या सुरक्षा आणि गोपनीयता व्यवहारांबद्दल इथे अधिक जाणून घ्या.
तुम्ही Android वर Outline अॅपची बीटा आवृत्ती वापरत असल्यास, डीबगिंग माहिती गोळा करण्यासाठी, आम्ही Google ची Firebase सेवा वापरू शकतो, ज्यामुळे आम्हाला समस्या डिटेक्ट करण्यात आणि Outline मध्ये सुधारणा करण्यात मदत होऊ शकते. तुम्ही Firebase च्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणांबद्दल त्यांच्या वेबसाइटवर अधिक जाणून घेऊ शकता: firebase.google.com/support/privacy. Outline द्वारे ही माहिती Firebase मार्फत पाठवली जाऊ नये असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया अॅपची उत्पादन आवृत्ती वापरा.