परिभाषा
VPN म्हणजे काय?
व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) हे तुमच्या डिव्हाइस आणि होस्ट सर्व्हर यांदरम्यानचे खाजगी कनेक्शन आहे. तुम्ही VPN वापरता, तेव्हा तुमचे ट्रॅफिक हे इंटरनेट पुरवठादारापासून लपवलेले असते. तुम्हाला पुढील बाबतींत VPN वापरावेसे वाटू शकते:
- सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरताना तुमच्या डेटाचे संरक्षण करणे
- तुमचा इंटरनेट पुरवठादार आणि सरकारी संस्था यांपासून तुमचा ब्राउझिंग डेटा खाजगी ठेवणे
- जगभरातील विविध स्रोतांकडील सेन्सॉर न केलेला आशय अॅक्सेस करणे
Outline हे पारंपरिक VPNs पेक्षा वेगळे कसे आहे?
इंटरनेट पुरवठादार हे सामान्य सुरक्षा प्रोटोकॉल आणि/किंवा ट्रॅफिकच्या प्रमाणाचे पॅटर्न ओळखून पारंपरिक VPNs सहजपणे डिटेक्ट अथवा ब्लॉक करू शकतात. Outline हे पारंपरिक VPNs पेक्षा अधिक लवचिक आहे, कारण ते डिटेक्ट करण्यास कठीण आणि म्हणून ब्लॉक करण्यास अधिक कठीण असण्यासाठी डिझाइन केलेला प्रोटोकॉल वापरून तयार केलेले आहे. Outline हे नेटवर्कवर आधारित ब्लॉकिंग आणि आयपी ब्लॉकिंग यांसह, सेन्सॉरशिपच्या अत्याधुनिक स्वरूपांना अवरोध करते.
Outline सर्व्हर म्हणजे काय?
Outline सर्व्हर हा परवानगी असलेले वापरकर्ते ज्याच्याशी कनेक्ट करतील असे VPN रन करतो. तुम्ही नवीन नेटवर्क तयार करत असल्यास, तुमच्या Outline सर्व्हरप्रमाणेच, तुमच्याकडे तुमचा स्वतःचा सर्व्हर असल्यास तो वापरू शकता किंवा तुम्ही क्लाउड सेवा पुरवठादार वापरू शकता, जसे की:
- DigitalOcean
- Google Cloud Platform (GCP)
- Amazon Web Services (AWS)
तुम्ही Outline Manager मध्ये तुमचा सर्व्हर सेट करू शकता.
सेवा व्यवस्थापक म्हणजे काय?
सेवा व्यवस्थापक म्हणजे Outline सर्व्हर सेट करणे आणि वापरकर्त्यांसोबत अॅक्सेस की शेअर करणे यांसाठी जबाबदार असलेली व्यक्ती. सेवा व्यवस्थापक हा सर्वसाधारणपणे सर्व्हरच्या वापराच्या खर्चासाठी जबाबदार असतो.
अॅक्सेस की म्हणजे काय?
अॅक्सेस की ही सध्याचा Outline सर्व्हर अॅक्सेस करण्यासाठी आणि VPN शी कनेक्ट करण्यासाठी वापरली जाते. सेवा व्यवस्थापक तुम्हाला अॅक्सेस की देईल किंवा तुम्ही स्वतःOutline सर्व्हर सेट करणे हे करू शकता. अॅक्सेस की कशी दिसते त्याचे उदाहरण इथे दिले आहे (फक्त नमुना; काम करणार नाही):
ss://[email protected]:39485/?outline=1
Outline Manager म्हणजे काय?
Outline Manager हे डेस्कटॉप अॅप्लिकेशन आहे, जे सेवा व्यवस्थापकाला Outline सर्व्हर सेट करू देते, अॅक्सेस की जनरेट करू देते आणि प्रति की वापरावर डेटा मर्यादा सेट करू देते. तुम्ही Outline Manager ची नवीनतम आवृत्तीइथे किंवाइथे डाउनलोड करू शकता.
Outline Client म्हणजे काय?
Outline Client हे डेस्कटॉप आणि मोबाइलसाठी उपलब्ध असलेले अॅप्लिकेशन आहे, जे तुम्हाला Outline सर्व्हरशी कनेक्ट करू देते आणि अॅक्सेस की वापरून VPN अॅक्सेस करू देते. तुम्ही Outline Client ची नवीनतम आवृत्तीइथे किंवाइथे डाउनलोड करू शकता.
डेटा मर्यादा म्हणजे काय?
अती वापर रोखण्यासाठी आणि तुमचा खर्च अंदाज करण्योयाग्य ठेवण्यात मदत करण्यासाठी, Outline Manager सेवा व्यवस्थापकांना अॅक्सेस कीवर ३० दिवसांची ट्रेलिंग डेटा मर्यादा सेट करू देतात. सेवा व्यवस्थापक प्रत्येक कीला लागू होणारी डीफॉल्ट मर्यादा सेट करू शकतात आणि डीफॉल्ट मर्यादा ओव्हरराइड करण्यासाठी कोणत्याही कीवर वेगळी मर्यादादेखील सेट करू शकतात. मर्यादा सेट केल्यावर, ती तात्काळ लागू होते आणि तिची दर तासाला अंमलबजावणी केली जाते.
सेवा व्यवस्थापकांनी Jigsaw सोबत मेट्रिक शेअर करणे निवडल्यास, डेटा मर्यादांच्या वापराचा अहवाल कसा दिला जाईल याबाबतच्या तपशिलांसाठी, त्यांनीडेटा संग्रह धोरण पहावे.