Skip to main content

मी अ‍ॅक्सेस कीवर डेटा मर्यादा कशी सेट करावी?

तुम्ही सर्व अ‍ॅक्सेस कीवर लागू होणारी डेटा मर्यादा सेट करू शकता. मर्यादा सेट करण्यासाठी, Outline Manager उघडा आणि सेटिंग्ज वर नेव्हिगेट करा. तिथे तुम्हाला डेटा मर्यादा टॉगल दिसेल. तो सुरू केल्यावर, तुम्ही मर्यादा सेट करू शकाल.

Data limits setting in Outline Manager

तुम्ही मर्यादा सेट केल्यावर, प्रत्येक वापरकर्ता मर्यादेच्या कितपत जवळ आहे हे ॲक्सेस की पेजवर पाहू शकता. या पेजवर एका बार आलेखामध्ये मागील ३० दिवसांचा डेटा वापर दाखवला जातो.

Outline Manager's Access Key page

तुमच्या सर्व अ‍ॅक्सेस कीसाठी मर्यादा सेट करता येण्यासोबतच, तुम्ही प्रत्येक कीला तिची स्वतःची डेटा मर्यादा देऊ शकता. हे सेटिंग तुम्ही सेट केलेली कोणतीही डीफॉल्ट डेटा मर्यादा ओव्हरराइड करेल, पण तुम्ही डीफॉल्ट डेटा मर्यादा सेट केली नसल्यास, तुम्ही तरीही कोणत्याही कीसाठी डेटा मर्यादा सेट करू शकता.

एखाद्या कीची डेटा ट्रान्सफर मर्यादा सेट करण्यासाठी, Outline Manager उघडा, तुम्हाला सेट करायची की असलेल्या कनेक्शन टॅबवर नेव्हिगेट करा आणि कीच्या पंक्तीच्या उजवीकडील मेनूवर क्लिक करा. तिथून, डेटा मर्यादा वर क्लिक करा. "माझी ॲक्सेस की" वर डेटा मर्यादा बदलण्यासाठी, डेटा मर्यादा आयकन Data limits icon वर क्लिक करा.

Selecting the data limit setting icon for an individual access key

कस्टम डेटा मर्यादा सेट करा निवडा. तुम्ही हा चेकबॉक्स निवडल्यावर, एक फील्ड दिसेल, जेथे तुम्ही त्या कीसाठी कस्टम डेटा मर्यादा सेट करू शकता. तुमचे डेटा मर्यादा सेट करणे पूर्ण झाल्यावर ती सेव्ह करण्यासाठी, सेव्ह करा बटणावर क्लिक करा.

Setting a data limit for an individual access key

निवडलेल्या कीसाठी तुम्ही तुमची डेटा ट्रान्सफर मर्यादा सेव्ह केल्यावर, मुख्य स्क्रीनवर प्रत्येक कीच्या (मागील ३० दिवसांमधील) डेटा वापराच्या बाजूला मर्यादा दिसेल.

ॲक्सेस कीवरून डेटा मर्यादा काढून टाकण्यासाठी, पूर्वीप्रमाणे कीच्या डेटा मर्यादा डायलॉगवर नेव्हिगेट करा, कस्टम डेटा मर्यादा सेट करा असे लेबल असलेल्या चौकटीतील खूण काढा आणि सेव्ह करा बटणावर क्लिक करा.

Removing the data limit on an individual access key

डेटा मर्यादा यासंबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

३० दिवसांची ट्रेलिंग डेटा मर्यादा म्हणजे काय?

३० दिवसांची ट्रेलिंग डेटा मर्यादा ही प्रत्येक कीच्या मागील ३० दिवसांतील वापराची बेरीज करेल आणि कीचा त्या कालावधीतील वापर मर्यादेच्या आत ठेवेल. याचा परिणाम म्हणून, ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी दिवस असलेल्या कॅलेंडर दिवसांसह, कोणत्याही ३० दिवसांच्या कालावधीत की मर्यादा ओलांडू शकत नाही. प्रत्यक्षात, याचा अर्थ असा होतो, की प्रत्येक वापरकर्त्याचा उपलब्ध डेटा प्रत्येक दिवशी त्यांनी ३१ दिवसांपूर्वी वापरलेल्या डेटाइतका वाढेल.

Outline हे ट्रेलिंग मर्यादा का वापरते?

ट्रेलिंग मर्यादा प्रत्येक ३० दिवसांच्या कालावधीमध्ये हमी पुरवतात, म्हणजेच सारख्या हमी पुरवत असतानाच, त्या काँफिगर करण्यासाठी आवर्ती मर्यादेपेक्षा (जसे की महिन्याचा कस्टमाइझ करता येणारा दिवस) अधिक सोप्या असतात. तसेच, त्या Outline डेटा वापराच्या सध्याच्या डिस्प्लेशी, त्याचप्रमाणे विश्लेषण सेवा आणि सर्व्हरची आकडेवारी यांसारख्या सामान्य टूलशी जुळतात.

डेटा मर्यादेमध्ये कोणता डेटा मोजला जातो?

प्रत्येक अ‍ॅक्सेस कीचे सर्व्हरमधून निर्गमन हे ताळ्यामध्ये समाविष्ट केले जाते. काटेकोरपणे सांगायचे, तर याचा अर्थ कीच्या वतीने सर्व्हरच्या बाहेर, त्याचप्रमाणे क्लायंटकडे परत पाठवला गेलेला डेटा. प्रत्यक्षात, कीवरून सर्व्हरला आणि परत पाठवल्या गेलेल्या ट्रॅफिकशी हे चपखलपणे अलाइन व्हायला हवे, त्यामुळे ते वापरकर्त्यांच्या ताळ्यांशी जुळेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही निर्गमन निवडले, कारण आम्ही ज्यांचे सर्वेक्षण केले ते क्लाउड पुरवठादार त्यासाठीच बिल करतात.

वापरकर्त्यांनी त्यांची डेटा मर्यादा ओलांडली असल्यास, त्यांना सूचित केले जाईल का?

या क्षणी नाही. अनेक क्लाउड पुरवठादार पूर्ण महिन्यासाठी १TB सारख्या मर्यादेचा समावेश करतात, जे १०० GB प्रमाणे १० वापरकर्त्यांना किंवा १० GB प्रमाणे १०० वापरकर्त्यांना सपोर्ट करू शकते. या बर्‍याच मोठ्या संख्या आहेत आणि अनेक वापरकर्ते त्या गाठतील अशी आम्हाला अपेक्षा नाही. वापरकर्त्यांनी त्यांच्या मर्यादा गाठल्यावर ते सर्व्हर व्यवस्थापकांशी संपर्क साधतील अशी आम्हाला आशा आहे. मात्र, तुमच्या यूझ केसमध्ये सूचना कशा मदत करू शकतील याबाबत तुमच्या इनसाइटसाठी आम्ही आभारी राहू आणि तुम्ही आमच्याशी इथे संपर्क साधू शकता.

वापरकर्त्यांनी त्यांची डेटा मर्यादा गाठ्ल्यास त्यांना सूचित केले जाईल का?

मर्यादा संपत आलेल्या वापरकर्त्याला मिळणार असलेल्या नव्या डेटाचे प्रमाण दर दिवशी वेगळे असेल, कारण ते त्यांच्या ३० दिवसांपूर्वीच्या वापरावर आधारित असते. चेतावणी दिल्यामुळे अंतिम वापरकर्त्यांना मदत होण्याऐवजी त्यांचा गोंधळ होईल असे आम्हाला वाटते. या वर्तनाबाबत तुम्ही इथे दिलेल्या फीडबॅकबद्दल आम्ही आभारी राहू.

मला वापरकर्त्याचा डेटा वापर रीसेट करता येईल का?

नाही, वापरकर्त्याच्या मर्यादेमध्ये नेहमी मागील ३० दिवसांच्या डेटा वापराचा समावेश असतो. मात्र, तुम्ही त्यांच्या कीची डेटा मर्यादा वाढवू शकता किंवा त्यांच्यासाठी नवीन की तयार करू शकता.

मी डेटा मर्यादा सुरू करताच माझ्या काही वापरकर्त्यांनी अ‍ॅक्सेस का गमावला?

डेटा मर्यादा या वापरकर्त्याच्या मागील ३० दिवसांच्या डेटा ट्रान्सफरवर आधारित असतात, ज्या डेटा मर्यादा सुरू केलेल्या असल्या किंवा नसल्या तरीही रेकॉर्ड केल्या जातात. मर्यादा लागू केली जाण्यापूर्वी संबंधित वापरकर्त्यांनी आधीच मर्यादा ओलांडली असणे शक्य आहे. एकाच कीची डेटा मर्यादा बदलत असतानादेखील सर्व डेटा मर्यादांची अंमलबजावणी केली जाते हेदेखील लक्षात ठेवा.

मला सर्व्हर व्यापणारी मर्यादा सेट करता येईल का, जसे की “प्रति ३० दिवस १ TB”?

या क्षणी नाही. आम्हाला तुमच्या यूझ केसबद्दल इथे अधिक ऐकायला आवडेल.

डीफॉल्ट डेटा मर्यादा आणि विशिष्ट कीवर डेटा मर्यादा असल्यास, कोणत्या मर्यादेची अंमलबजावणी केली जाईल?

विशिष्ट कीची डेटा मर्यादा ही तुम्ही सेट केलेल्या (कोणतीही असल्यास) डीफॉल्ट डेटा मर्यादेला ओव्हरराइड करेल.

डीफॉल्ट डेटा मर्यादा सेट न करता मला विशिष्ट कीसाठी डेटा मर्यादा सेट करता येईल का?

होय. एका कीवर डेटा मर्यादा सेट करण्यासाठी तुम्ही डीफॉल्ट डेटा मर्यादा निर्देशित करणे आवश्यक नाही. उदाहरणार्थ, जी की मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाईल असे तुम्हाला वाटते त्या कीमार्फत स्वतःचे अती प्रमाणावरील डेटा ट्रान्सफरपासून संरक्षण करण्यासाठी, त्या एका कीवर तुम्ही डेटा मर्यादा सेट करू शकता.