"Outline रन करण्यासाठी किती खर्च येतो?"
तुम्ही VPN व्यवस्थापित करणारा सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर असाल किंवा मुक्त इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी Outline वापरणारी एखादी व्यक्ती असाल, Outline सॉफ्टवेअर हे सर्वांसाठी विनामूल्य आहे.
मात्र, Outline ला रन करण्यासाठी क्लाउड सर्व्हरच्या अॅक्सेसची आवश्यकता असते. आधीपासून सर्व्हरचा अॅक्सेस असणारे सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर हे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यावर Outline इंस्टॉल करू शकतात. सर्व्हरचा अॅक्सेस नसणाऱ्या व्यक्ती १ टेराबाइटच्या डेटा ट्रान्सफर अलावन्ससाठी सुमारे $५ USD प्रति महिना या किमतीमध्ये DigitalOcean किंवा Amazon वेब सेवा यासारख्या क्लाउड सेवा पुरवठादाराकडून अॅक्सेस मिळवू शकतात — एका सर्व्हरवर शेकडे वापरकर्त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे पुरेसे आहे.
तुमच्या आवडीच्या क्लाउड पुरवठादारासह Outline रन करण्यासाठी किती खर्च येईल हे निर्धारित करण्याकरिता तुम्ही गणित कसे मांडू शकता याचे उदाहरण:
| प्रति वापरकर्ता ५ गिगाबाइट डेटा ट्रान्सफरचा सरासरी मासिक वापर गृहीत धरल्यास, दरमहा $५ USD च्या प्लॅनमध्ये एकाच वेळी सुमारे २०० वापरकर्त्यांना अनुमती मिळेल, ज्यामुळे प्रति वापरकर्ता दरमहा फक्त २.५ सेंट इतकाच खर्च होईल. लक्षात घ्या, की वापरकर्ते हे कमी बँडविड्थची अॅक्टिव्हिटी करत आहेत की जास्त बँडविड्थची यानुसार प्रति वापरकर्ता दरमहा वापरला जाणारा डेटा ट्रान्सफर हा खूप मोठ्या प्रमाणात बदलेल, पण ट्रॅफिकमधील ही वाढ सामावून घेण्यासाठी बहुतांश क्लाउड पुरवठादार त्यांच्या क्षमतेमध्ये फेरबदल करतील. |
|---|
खरेतर, Jigsaw आणि Google वर Outline हे पूर्णतः निनावी असते. तुमची ओळख किंवा ट्रॅफिक आम्ही ट्रॅक करत नाही आणि यावरून कमाई करण्याची आमची कोणतीही योजना नाही. त्याऐवजी, आम्हाला आमच्या वापरकर्त्यांना कोणत्याही शुल्काशिवाय सॉफ्टवेअर पुरवता येईल, याची खात्री करण्यासाठी आमच्या मुक्त स्रोत समुदायासोबत आम्ही काम करतो. आम्ही गोळा करतो त्या डेटाबद्दल इथे अधिक जाणून घ्या.