Skip to main content

Outline सर्व्हर सेट करण्याशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

मला सर्व्हरशिवाय Outline वापरता येईल का?

दुर्देवाने, नाही. सर्व्हर तुमच्याद्वारे, तुमच्या संस्थेद्वारे किंवा विश्वासू तृतीय पक्षाद्वारे व्यवस्थापित केला असला, तरीही Outline सॉफ्टवेअरला सर्व्हरचा ॲक्सेस आवश्यक आहे.

Outline सर्व्हर सेट करण्यासाठी किती वेळ लागतो?

बऱ्याच बाबतीत, ५ मिनिटांपेक्षा कमी वेळ. तुम्ही कोणत्याही क्लाउड सर्व्हरवर Outline इंस्टॉल करू शकता, पण वापरकर्त्यासाठी आणखी अनुकूल, मार्गदर्शित इंस्टॉलेशनचा अनुभव देण्यासाठी आम्ही DigitalOcean सोबत काम केले आहे, जिथे तुम्ही काही क्लिक करून सर्व्हर सेट करू शकता—स्क्रिप्टची गरज नाही.

तुम्ही AWS, GCP किंवा प्रगत सेटअप निवडल्यास, आम्ही सर्व्हर इंस्टॉलेशन प्रक्रिया ही एका स्क्रिप्टमध्ये सरलीकृत केली आहे, जी बऱ्याच ठिकाणी उपयोगी ठरते.

मला Outline सर्व्हर कुठे सेट करता येईल?

तुम्ही बहुतांश क्लाउड पुरवठादारांवर Outline सर्व्हर सेट करू शकता, जिथून कुठूनही ते ऑपरेट केले जातात.

DigitalOcean वर सेट करणे हा सर्वात सोपा पर्याय आहे, कारण त्यामध्ये ॲम्स्टरडॅम, टोराँटो, सॅन फ्रान्सिस्को आणि सिंगापूर यांसारख्या अनेक ठिकाणी सर्व्हर आहेत. तुम्ही दुसऱ्या क्लाउड पुरवठादार किंवा तुमच्या स्वतःच्या संरचनेवर इंस्टॉल करण्यासाठी प्राधान्य दिल्यास, तुम्ही Outline व्यवस्थापक ॲप्लिकेशनमध्ये ‘प्रगत मोड’ निवडू शकता आणि सेटअप स्क्रिप्ट वापरून इंस्टॉलेशनशी संबंधित सूचना फॉलो करू शकता.

मी माझा Outline सर्व्हर कुठे सेट केला पाहिजे?

  1. तुमच्या Outline सर्व्हरसाठी स्थान निवडताना, तुम्ही काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे:
  2. Outline सर्व्हरचे स्थान हे वापरकर्ते इंटरनेटचा कसा अनुभव घेतात यावर परिणाम करते. उदाहरणार्थ, सर्व्हर ॲम्स्टरडॅममध्ये असल्यास, हा सर्व्हर ॲक्सेस करणाऱ्या वापरकर्त्याला इंटरनेटचा असा अनुभव येईल, जसे की तो प्रत्यक्षात नेदरलँड्समध्ये आहे. काही वेबसाइट अजूनही डचमध्ये दिसू शकतात. साधारणपणे, तुम्ही वेबसाइटवरील भाषा सिलेक्टर वापरून स्थानिक भाषेवर ओव्हरराइड करू शकता.
  3. तुमचे वापरकर्ते आणि Outline सर्व्हरमधील अंतर तुमच्या गतींवर परिणाम करू शकते. सर्वसाधारणपणे, Outline वापरकर्ते आणि सर्व्हरमधील भौतिक अंतर वापरकर्त्यांच्या इंटरनेट गतींवर परिणाम करू शकते. बऱ्याच बाबतीत, तुमचे अपेक्षित वापरकर्ते जिथे असतील त्या ठिकाणाहून तुम्ही सर्वात जवळचे सर्व्हर स्थान निवडू शकता, पण तुमच्या देश किंवा प्रदेशाशी कोणत्या इंटरनेट केबल कनेक्ट होतात हे पाहण्यासाठी तुम्ही Submarine Cable Map तपासू शकता.
  4. तुमचा VPN सर्व्हर कुठे स्थित आहे याचा कायदेशीर फ्रेमवर्कवर परिणाम होऊ शकतो. कृपया लक्षात ठेवा, की Outline सॉफ्टवेअर तुमचे ट्रॅफिक लॉग करत नाही. Outline वापरताना सुरक्षा आणि गोपनीयता याविषयी अधिक जाणून घ्या.