Skip to main content

Linux वर Outline क्लायंट इंस्टॉल करणे

Outline क्लायंट च्या 1.15 या आवृत्तीपासून, भविष्यातील सर्व आवृत्त्या Linux ऑपरेटिंग सिस्टीमसाठी Debian पॅकेज म्हणून रिलीझ केल्या जातील. आम्ही कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमना सपोर्ट करतो याबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या किमान सिस्टीम आवश्यकता यांचे पुनरावलोकन करा.

Debian वर आधारित Linux डिस्ट्रिब्यूशनसाठी Outline क्लायंट इंस्टॉल करणे (शिफारस केलेले)

पुढील कमांड फॉलो करा:

  1. Outline ची रीपॉझिटरी की इंस्टॉल करा आणि रीपॉझिटरी जोडा.
    wget -qO- https://us-apt.pkg.dev/doc/repo-signing-key.gpg | sudo gpg --dearmor -o /etc/apt/trusted.gpg.d/gcloud-artifact-registry-us.gpg
    echo "deb [arch=amd64] https://us-apt.pkg.dev/projects/jigsaw-outline-apps outline-client main" | sudo tee /etc/apt/sources.list.d/outline-client.list

२. apt पॅकेजची सूची अपडेट करा आणि Outline क्लायंट ची नवीनतम आवृत्ती इंस्टॉल करा.

sudo apt update
sudo apt install outline-client

भविष्यात अपडेट तपासण्यासाठी किंवा इंस्टॉल करण्यासाठी, पायरी २ मधील कमांड पुन्हा रन करा. लक्षात ठेवा, की Linux वर Outline क्लायंट च्या 1.15 या आवृत्तीपासून पुढील आवृत्तींसाठी ॲपमधील ऑटो-अपडेट बंद केले आहे.

Outline क्लायंट अनइंस्टॉल करण्यासाठी, खालील कमांड रन करा:

sudo apt purge outline-client

दुसरा पर्याय

  1. https://s3.amazonaws.com/outline-releases/client/linux/stable/outline-client_amd64.deb वरून नवीनतम Outline क्लायंट Debian पॅकेज डाउनलोड करा
  2. पॅकेज इंस्टॉल करण्यासाठी कमांड लाइनमध्ये पुढील कमांड रन करा
wget -O ./outline-client.deb https://s3.amazonaws.com/outline-      releases/client/linux/stable/outline-client_amd64.deb
sudo apt install ./outline-client.deb

३. अपडेट आहेत का हे मॅन्युअली तपासा, कारण Linux वर Outline क्लायंट च्या 1.15 या आवृत्तीपासून पुढील आवृत्तींसाठी ॲपमधील ऑटो-अपडेट बंद केले आहे.

४. Outline क्लायंट अनइंस्टॉल करण्यासाठी, कमांड लाइनमध्ये पुढील कमांड रन करा:

sudo apt purge outline-client